संस्थानाची वेब साईट hansathrtha.in

|| श्री सदगुरू प्रासादिक नित्योपासना ||


श्री सदगुरुवे नमः
ओम नमो नारायणाय सिद्ध पुरुषाय ब्रम्हीभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो मनः ( प्रासादिक श्री सदगुरू भगवती काव्योपासाना) श्री सदगुरू अण्णा महाराजांनी खडतर पुरश्चरण करून श्री सगुण साकार उपासनेत सतत मग्न राहून, भक्तांसाठी, जनकल्याणासाठी सर्वरूपाने यश कल्याण होईल, येणाऱ्या पुढच्या पिढीला हि संस्कार घडतील, ह्या तगमगीने, साध्या सराळ सोप्या भाषेत पद्यरुपात श्री भगवतीला आळवले आहे. तेभक्तांना, साधकांना, उपासकांना सहज अर्थ उमजेल, सहजआत्मज्ञान, अध्यात्म ज्ञानाची ओळख पटत अभ्यासाकडे जाण्याचा मार्ग मिळेल, मनातील भाव कळतील, अशा पद्धतीने रचना केली. जो श्रध्देन, आत्मचिंतन करील, अद्वेतात राहील, त्याला लवकर प्रचिती येईल. कारण कुणालाही अंहकार सहन होत नाही. उपासनेतील वृती, एकता, समता, लीनता, दृढता, ह्या नियमाप्रमाणे श्री महाराजांनी पहिल्या पासून सांगत आले आहे. (एकता राहिली की सर्व आनंद प्राप्त होतो. नाहीतर अधीष्ठाणालाही त्रास होतो. अश्या वागण्याने प्रगती खुंटून राहते. ह्या करिता तगमगीने सर्व सांगितले आहे. ह्यात पसायदानाचे रसाप्रमाणे
" जो जो वांछिल | तो ते लाहो प्राणिजात | " हा सार भक्तांना लाभेल, मिळेल.)
|| जय जगदंब ||

आप्पा महाराज

सदगुरु दर्शन

उपासनेचा पत्ता


फिरती उपासना

पत्ता : बाबा पेट्रोल पंप मागे, भाग्य नगर औरंगाबाद.

तारीख: १६-०४-२०१७   रविवार : ६:३० संध्या ते ८:३० संध्या

फोन : मोबाईल : ९९२३९५९९८२

ई-मेल : rahul.ambekar2@gmail:

उपासनेचे स्वरूप

|| श्री हरिहर शक्ती पीठ रेणुकामाता मंदिर औरंगाबाद ||

भगवती काव्योपासनेचे नियम

|| श्री सदगुरू प्रासादिक नित्योपासना ||


|| श्री रेणुकामाता विजयते ||
|| मम आत्मन: श्रुती स्मृती पुराणोक्त, शास्त्रोक्त पुण्य फल प्रप्तर्थ्य सहकुटुंबानां सह्पारीवारणां क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिव्रद्यर्थ सायंकाल, श्री गुरोःपरमेष्ठो गुरो: परात्पर गुरुमूर्ती ब्राम्हीभूत राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज गुरुदेवता तथा श्री श्री राज राजेश्वरी त्रिगुणात्मिका रेणुका मत देवता पंचोपचार पूर्वक पूजन, अहं करिष्ये || ह्या संकल्पानंतर श्री भगवती, प.पू. श्री अणा महाराज, प.पु. श्री सद्गुरू अप्पा महाराज या सर्वांच्या प्रतिमेची पंचोपचार पूर्वक पूजा करावी. गंध,हळद,अक्षदा कुंकू (प.पु. अण्णांना भस्म) हर, फुले,इत्यादी अर्पण करावीत व त्या नंतर धूप दीप , नैवेद्य दाखवून उपासनेला सुरुवात करावी.

“जय जगदंब ” नाम जप सामूहिकरीत्या एक माळ करावा.

माते तुझे ध्यान आम्हासी राहो | तुझे नाम अमुचे मुखासी येवो || माते तुझे आम्ही दासानुदास | नमस्कार माते तुझ्या चरणांस || जगदंब जगदंब ऐसे म्हणावे | देहातीत होवोनि जावे || स्वानंद साम्राज्य भोगावे | समाधी स्तिती ||

रेणुका माता की जय

योगीराज स्वामी ब्रम्हरूप ध्यानी | ओंकार नामे सदा धुंद मनी || असे सतत रेणुका ध्यान स्वरूपी | सदनंदी आनंदी चिद्घनानंद मूर्ती ||

||ओम नमो नारायणाय सिधापुरुषाय ब्राम्हीभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः||


|| नाम गजर ||
जय जगदंब जय जगदंब ||
जय जगदंब जय जगदंब ||
रेणुकामाता की जय ||
राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय ||
सद्गुरू आप्पा महाराज की जय ||
सर्वरूपे जगदंब जगदंब |
राधाकृष्ण हर गोविंद ||
रेणुका माता की जय ||


देवा लंबोदर गिरीजा नंदना
पूर्ण करी मन कामना ||धृ||
वक्रतुंड सुहास्य वदना
लंबोदरा मायुर वाहना
बुद्धी देई तु नाग भूषणा ||१||
कृष्णतनय हरी विनवी
एक्यरुपात आम्हा ठेवी
नको देऊ तु द्वैत भावना ||२||
मंगलमुर्ती मोरया || सिद्धिविनायक महाराज की जय ||


सुंदर ते ध्यान रेणुका मातेचे |
जगदंबेचे जगदंबेचे ||धृ||
मोतियांचे हार हिरे चमकती |
गळा हि शोभती तारांगणे ||१||
नाकी नथ साजिरी कानी मुरक्या बाळी |
माथा बिंदील्याली, लखलखीत ||२||
कृष्णतनय हरी शरण रेणुकेसी |
निरंतरी राहो ऐसी या ध्यानासी ||३||
रेणुकामाता की जय ||


हरा हरा महादेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा ||
शंकर शंकर जय शिव शंकर
जय शिव शंकर जय शिव शंकर ||
पार्वतीपते हर हर महादेव |
काशीविश्वेश्वर महाराज की जय |
सोनेश्वर महाराज की जय |
हरिहरेश्वर महाराज की जय |

( एखादे पांडुरंगाचा अभंग म्हणावा – रूप पाहता लोचनी )
जय जय रामकृष्ण हरी || जय जय रामकृष्ण हरी ||
पंढरीनाथ महाराज की जय |
गोपालकृष्ण भगवान की जय |
माउली ज्ञानेश्वर महाराज की जय |


नित्यानदी स्वरूप तुमचे वायु समे संचरे |
ब्रम्हानंदी निमग्न असता तूची आता धाव रे ||
(प्रत:काळी / मध्यांनकाळी / सायंकाळी)
सायंकाळी तुम्हासी स्मरता विघ्नेची होती दूर रे |
सिद्धनाथ येउनी आता भक्तासी तू पवरे ||
|| सद्गुरू सिद्धनाथ महाराज की जय ||

परत्ब्रम्ह उभे दिगअंतरी हो |
मूर्ती कैसी साजे पृथ्वी वारी हो ||
दिगंबरी सर्व भास्मांग तेजे |
समाधिस्त स्वामी कृष्णानंद साचे ||
|| ओम नमो नारायणाय सिद्ध पुरुषाय ब्राम्हीभूत कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराजाय नमो नम: ||


जगी साध्वी झाली प्रेमानंदीनाथा |
कलियुगे ही धन्य धन्य माता ||
प्रेमळू दयाळू अती आर्द्र चित्ता |
नमस्कार माझा प्रेमानंदी नाथा ||
|| प्रेमानंदीनाथ महाराज की जय ||


|| धावा ||

सद्गुरूराया नमन असो तुमचे पाया || धृ ||
आकाश मार्गी तुमचे गमन, ब्रम्हानंदी निमग्न असून |
दर्शन देई झडकरी जाण, हरी लागे तव पाया ||
नमन असो तुमचे पाया ||
सद्गुरुनाथ माझे आई | मजला ठाव द्यावा पायी ||
दिगंबरा दिगंबरा | श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
ब्रम्हा विष्णू महेश्वरा | ब्रम्हा विष्णू महेश्वरा |
सद्गुरुनाथ सिद्धनाथ | सद्गुरुनाथ सिद्धनाथ ||
कृष्णानंद जय, कृष्णानंद जय |
कृष्णानंद जय, कृष्णानंद जय ||
जय जय योगीराज स्वामी | जय जय योगीराज ||
जय जय योगीराज माता प्रेमानंदीनाथ ||
|| सद्गुरू सिद्धनाथ महाराज की जय ||
|| कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ||
|| राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय ||
|| प्रेमानंदीनाथ महाराज की जय ||
|| सद्गुरू आप्पा महाराज की जय ||
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

||श्री योगपीठासन स्तोत्र||

गणेशाय नम:
सरस्वत्यै नम:
रेणुकमातायै नम:
गुरुभ्यो नम:
आधी नमोनि विघ्नेश्वरासी शरण जाऊ शिवशक्तिसी |
योग पीठासन शक्तिसी नमन माझे निरंतर ||1||
कुलस्वामिनी रेणुकामाता तिचे चरणी माझा माथा |
योग पीठासन स्वरुपस्थिता तिच असे सर्वकाळ||2||
सदगुरुंसी करुनी नमन माता पितरांचे वंदिले चरन |
वडिल बंधू इष्ट मित्र जाण सकला नमन असो पहा ||3||
चारी वर्णी स्थावर जंगम सकला ठाई एकची ओम |
परब्रह्य असे हेचि सुगम दर्शना आनंद मिळेल बा ||4||
निर्गुण निराकार झाले सगुण त्रिगुणात खेळे शक्ति जाण |
त्रिगुणातीत पुनरपी होवून परमानंद मिळेल पहा ||5||
म्हणोनी हा बालक शरण आला शिवशक्ति चरणी लागला |
देई मज आता अभयाला हिच विनंती आपुले पायी ||6||
रेणुकाई म्हणजे आपुले स्वरुप सेवा करुनि घ्यावी अमुप|
साक्षात्कारे रिझवावे मन देख सर्वकळ ||7||
विद्या शिकलो नाही पुर्ण पणे व्यवहारिक ज्ञान रहिले उणे |
तुचि आता सांभाळून घेणे अज्ञान या बालकासी ||8||
अखंड घडो आपली सेवा व्यसन नसावे कोणते जीवा |
नामस्मरणाचा मुखी द्यावा ठेवा हीच विनंती आईचे पाई ||9||
आई बाप स्वरुप एकची पाही दुजा भाव राहिला नाही |
एकत्वे सेवा घडो द्यावी सर्वकाळ ||10||
वेद विहित कर्म घडावे भक्तीमार्गासी लावावे |
अध्यात्म शास्त्र चोखाळावे सद्गुरु कृपे ||11||
सद्गुरु कृपा व्हावी बालकावर आईची सेवा करीन निरंतर |
परमानंद लुटीन वारंवार विदेह स्थिती होवोनिया ||12||
प्रपंचात मी राहीन व्यवहाराचे द्यावे ज्ञान |
धंदा रोजगार हा वाढवून धन संपत्ती मिळोबा ||13||
धन संपत्ती ही मिळवून दान धर्म घडो जाण |
साधू संत सेवा ही होवून मन स्थिर रहावे ||14||
भजन पूजन घडो द्यावे यज्ञ याग हे घडवावे |
वेद पठणे आळवावे तुजसी आई निरंतर ||15||
कृपा दृष्टी ठेवावी बाकलावरी नित्य धंदा मजुरी द्यावी तरी |
तेजोन्नती वाढवावी खरी आपुले सत्ते करोनीया ||16||
धंदा म्हणजे आत्म साधनाच होई मजुरी म्हणजे चित्ती समाधान देई |
संतोष वाढवूनी बुडवी आनंदी डोई आपुले सत्ते करोनीया ||17||
आनंदी आनंदात मिळवून विदेह स्थिती समाधी भोगून |
आत्म स्वरुपी राहुन कर्तव्यासी जागवी ||18||
कुणाचे ऋणात ठेवू नको कर्जवाढ होऊ देऊ नको |
आत्म स्वरुपा भुलवू नको हिच विनंती आईचे पाई ||19||
अपयशाचा वाटा नसावा आत्मबोध हा ठसवावा |
अहंकार हा रिझवावा आपुले सत्ते करोनीया ||20||
उपासना घडावी सगुण मुखी असावे नाम चिंतन |
घडो द्यावे भजन पुजन व्रत वैकल्य दान धर्म हा ||21||
सद आचार सद विचार सतसंग साधु बोध साचार |
घडो द्यावा हाची फार आपुले कृपे करोनीया ||22||
जितुके मागावे तितुके थोडे बुध्दी भ्रंश गात्र झाले वेडे |
काही सुचेना काय करावे गडे आई आई म्हणो आता ||23||
मनाची झाली ऐसी चंचलता आसन लावीले एकाग्र चित्ता |
डोळे झाकीले तत्वता नाम चिंतन सुरु केले ||24||
जगदंब जगदंब म्हणत मोठ मोठ्याने आरोळ्या देत |
कंठ दाटूनि गहीवर येत स्वरुप दावी शिवशिवा ||25||
सगुण साकार स्वरुप दाखवावे डोळ्याचे पारणे फेडावे |
आत्म स्वरुपात लीन करावे तग मग होतसे मनासी ||26||
ऐसी मनी तग मग होता मन झाले दुर तत्वता |
बुध्दीची होवूनी एकाग्रता चित्त जागी स्थिरावले ||27||
चित्त जागी स्थिरताची अहंकार वृत्ती गेली साची |
प्रगटोनी शिव शिवा तेची ऐक्य रुपे होवोनिया ||28||
समोर पाहता स्वरुपाला एका एकी कंठ दाटला |
सर्वांगी घाम फुटला स्तब्धता आली सर्व अंगी ||29||
वार्ता नाही अज्ञानाची ज्योत प्रगटली ज्ञान स्वरुपाची |
चित्ती आल्हाद मावेना तोचि परमानंद होतसे ||30||
सगुण साकार मुर्ती प्रगटली शिवशक्ती ऐक्य रुपे ठेली |
त्यांची चरणे आता वंदिली अति प्रेमे करोनीया ||31||
शिव पार्वती उभे जोडीने पाहिले ह्याच नयनाने |
दंडवत केले प्रेमाने शिवाशिवा ऐक्य होई ||32||
पार्वतीचेच रुप राहीले तेची रेणुका स्वरुप झाले |
प्रत्यक्ष डोळ्यापुढे दिसू लागले आनंद जीवा होतसे ||33||
रेणुकाई प्रत्यक्ष प्रगटून बोलू लागली प्रेमे जाण |
अभय देतसे वरदान अती प्रेमे करोनीया ||34||
हे स्थळ क्षेत्र होईल तीर्थ माझे येथे राहील |
योग पीठासनी मी बसेन अति प्रेमे करोनीया ||35||
सेवा घेईन सर्व भक्तांची मनोकामना पुरवील सर्वांची |
वंश परंपरा वाढवील साची भक्तराज बोलल्याप्रमाणे ||36||
जो चार अक्षरे जपेन जगदंब जगदंब ऐसे म्हणोन |
त्याची दुष्टाक्षरे मी पुसीन ललाटावरची ||37||
तो निर्भय नांदेल जगात सर्व ऐश्वर्य होईल किर्तीवंत |
शेवटी मिळेल आत्मस्वरुपांत कृत कृतार्थ होईल बा ||38||
ऐसा आशिर्वाद देवून रेणुकाई गुप्त झाली जाण |
भक्त पाही डोळे उघडून समोर काही दिसेना ||39||
आई गुप्त न होऊन योग पीठासनी राहिली जाण |
अखंड करावे तिचे ध्यान भजन पुजन हे करावे ||40||
हाची आदेश आईने दिला भक्त मनी संतोषला |
करोनी घेई आई सेवेला म्हणोनी नमन करी पहा ||41||
सगुन साक्षात्कार हाची झाला ऐसा मनी मानला |
तोची ध्यानी ठेविला सर्वकाळ ||42||
आईने काय सांगितले ते पुनरपी मनी आठवले |
तैसे वागावे आता भले तरीच सार्थक देहाचे ||43||
चार अक्ष्ररे तू जपावे जगदंब जगदंब ऐसे म्हणावे |
दोन अक्षरे अखंड घ्यावे सोहंसोहं म्हणोनीया ||44||
सर्व स्वरुपची कल्पना एकची करावी जाणा |
त्यातची पहाव्या आईच्या खुना सर्वकाळ ||45||
आई नटली जगदंतरी ब्रम्ह स्वरुपी हीच खरी |
भेद न उरला अंतरी अव्दैत रुपे रहावे ||46||
जगी राहूनी पाहता अव्दैत रुप तोची मानावा आत्मसाक्षात्कार देख |
विदेह स्थिती हेची होत क्षणा क्षणा माझी पहा ||47||
ऐसे आईचे बोल ते न व्हावे कदापी फोल |
त्यांच्या वाक्याशी सदा डोल म्हणूनी कळकळ लागली ||48||
म्हणूनी पुनरपी प्रार्थना करीतो आईचे चरणी आता लोळतो |
सेवे मध्ये देह झिजवितो रात्रंदिन आई गे ||49||
तुझी तुची करुनी घ्यावी सेवा जिवाला हेची वळण लावा |
अखंड असो आईचा धावा सर्वकाळ ||50||
ऐश्या स्त्रोत्राचा पाठ करावा देहाचा उध्दार करोनी घ्यावा |
आत्मसाक्षात्कार मिळवावा आईचे कृपे ||51||
एकावन्न मातृकांची साखळी सर्व तत्वा करी मोकळी |
मायेची निघुन जाईल पोकळी आत्म स्वरुप दिसेल पहा ||52||
हे ओम कार स्वरुप पीठासन प्रकृती पुरुष ऐक्य भाव जाण |
शिव शिवा स्वरुप प्रगट करुन आत्मसाक्षात्कार देते पहा ||53||
रेणुकेचे एक रुपांत होऊनी दर्शन भक्तांचे पुरवी लळे जाण |
आयुरारोग्य हे देवून वास करी भक्ता जवळी ||54||
मात्र नाम चिंतन केले पाहिजे समोर रेणुका ध्यान ठेवीजे |
गुरु कृपा पाठी मानीजे तेणे सर्व साधेल ||55||
इति जोशी कुलोत्पन्न कृष्णतनय हरी विरचीता
प्राकृत ओव्या योग पीठासन स्तोत्र
जगदंबार्पणमस्तु ||
रेणुकामाता की जय ||

||श्री सिद्धनाथ महाराज स्तोत्र||

गणेशाय नम:
नमन करु विघ्नेश्वरासी शरण जावे सद्गुरुसी |
भोगू आत्मानंदसी सर्वकाळ ||1||
सदगुरुराया तुम्हासी नमन वारंवार असो जाण |
दर्शन द्यावे झडकरी येऊन हिच विनंती चरणांसी ||2||
अनंत अपराध घाली पोटी अज्ञान उडवी झटपटी |
कृपादृष्टि व्हावी उठाउठी हिच विनंती चरणांसी ||3||
तुच आमुची कुलदेवता आराधना तुझीच आता |
पाठीराखा तुची असता शरण जाउ कवणासी ||4||
तुचि कर्ता तुचि भर्ता तुचि अससी अन्नदाता |
कुटुंब रक्षिसी तत्वता दर्शन द्यावे झडकरी ||5||
मति झालिसे भ्रांत काही सुचेना बैसलो निवांत |
मार्ग द्यावा आता त्वरित शरण शरण सर्वकाळ ||6||
प्रपंच हाची सुचेना परमार्थ हाची घडेना |
मन गोंधळले जाणा कवण्यावाटे जाऊ पहा ||7||
कर्म मार्ग बंद पडला चित्ताचा सर्व भास ऊडाला |
कोणत्या जाईल थराला हेचि काही कळेना ||8||
उपवास तेही घडेना निद्रापण ही हटेना|
नाम चिंतन मुखि येईना आळस सर्व भरला असे ||9||
विचार पण ते काही नाही मती माझी गुंगीत राही |
काय करावे आता पाही सदगुरुराया उमजेना ||19||
आपण सर्व मार्ग दाखविता तो न येई माझे हाता |
काय आहे हे ही न्युनता सदगुरुराया कृपा करी ||11||
आपण जे जे सांगितले आता पर्यंत करुनी घेतले |
लक्ष आता का कमी केले बालकावरचे पहा ||12||
सकाम तेही कळेना निष्काम ते ही वळेना |
गोंधळ झालासे मना दुर करी सदगुरुराया ||13||
त्रिविधतापातूनि मुक्त करावे अध्यात्ममार्गी रिझवावे |
सदैव येऊनी दर्शन द्यावे विनंती ही आपुले पायासी ||14||
आता पुर्ण करावी कृपा नेऊनी बैसावे निर्विकल्पा |
समाधि सुखाची अवस्था सर्वकाळ असावी ||15||
जी जी क्रिया सांगाल ती ती करोनि घ्यावी बहुमोल |
आम्ही पामर आहोत फोल अज्ञानी जैसे बालक ||16||
अज्ञान बालका हिरा देता फेकूनि तो तत्वता |
त्याचे ज्ञान तयासी नसता किन्मत त्याची तया नसे ||17||
तैसे झाले आम्हा अज्ञाना कृपा करावी झडकरी जाणा |
आत्मज्ञानाच्या द्याव्या खुणा हीच विनंती सदगुरुपायी ||18||
कर्म हीन झालो आता पुनित करावे तत्वता |
मार्ग द्यावा शिघ्रगता हीच विनंती तुमचे पायी ||19||
आपुली पुर्ण कृपा आहे म्हणोनि सर्व चालत आहे |
कुटुंब रक्षिले आपणची पाहे सर्व प्रकारे करोनिया ||20||
आपुली कैसी करावी स्तुती मज अज्ञाना नाही मती |
विशेषण काय द्यावे पुढती नमन नमन सर्वकाळ ||21||
मागणे एकची आता तव कृपा असावी अखंडीता |
अज्ञानी बालक शरण तत्वता सदगुरुयासी ||22||
आता साष्टांग करितो नमन चरणांसी बैसतो होऊनी लीन |
कृपा प्रसाद घेतो मागुन अत्यादरे करोनिया ||23||
द्यावा द्यावा आता प्रसाद हाच धरिला मनी हट्ट |
सदगुरुराये होवूनी प्रगट मस्तकी हस्त ठेवी पहा ||24||
समजावूनि बोल सांगतीऐकावे तुम्ही शीघ्रगती |
वागावे तैस्याच रिती अतिप्रेमे करोनीया ||25||
सांगितल्या नियमे वागावे अखंड आईचे ध्यान धरावे |
जगदंब जगदंब ऐसे म्हणावे सर्वकाळ ||26||
संग सर्वाचा सोडावा स्नेह रहीत देह असावा |
व्देष कुणाचा न करावा ऐसे सांगती गुरु ||27||
भय रहीत होवोनि आता एकग्रते करी चित्ता |
स्वस्वरुपा मिळुनी जाता खरा आनंद येईल पहा ||28||
भृंगीवत उच्चारण करी नामचिंतने स्वर धरी |
रंगुनी जाई नाम लहरी सर्वकाळ ||29||
तेणे साधेल भाव समाधी सुटतील सर्व उपाधी |
मुक्ती मिळेल सर्वा आधी गुरुकृपे करुनिया ||30||
ऐसे सांगता गुरुराया नमन केले लवलाह्या |
सदगुरु गुप्त होवोनिया आशिर्वादा देते जाहले ||31||
पतिपत्निने ऐसे वागावे देहाचे सार्थक करुनि घ्यावे |
जगदंबेसी प्रत्यक्ष पहावे ह्याची डोळा ||32||
आईची ती कृपा होता नांदेल सर्व समृध्दता |
इहपर सुखाची वार्ता येणे च सर्व साधेल ||33||
तळमळीने सर्व सांगुन गुप्त होती तेची क्षण |
सदगुरुरायासि करुनी नमन प्रार्थना हिच संपविली ||34||
ऐस्या स्तोत्राचा पाठ जो नित्य करील देख |
अंती पावेल मोक्षपदांस इहपर सौख्य साधुनिया ||35||

जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब

इति सदगुरु सिध्दनाथ महाराज स्तोत्र
कृष्णतनय हरी विरचिता जगदंबार्पणमस्तु ||
सदगुरु सिध्दनाथ महाराज की जय
कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय
राजाधिराज योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज की जय
|| श्री रेणुकादेवीची आरती ||
जय देवी अंबाबाई || परशुरामाचे आई |
आरती ओवाळीन | माझे रेणुका आई || धृ.||
मातापुरी तूझा वास | भक्त धरिती ध्यास |
संकट समयास | धाव घेई तू खास , जय || १ ||
काय वर्णू तुझे गुण | शेष थकला से जाण |
अज्ञान हरिपायी अंबे देई दर्शन , जय || २ ||
|| श्री हरीहरानंदनाथ यांची आरती ||
जय जय जय हरीनंदा नाथा - साथ ही शोभे प्रेमानंदा |
साधी भोळी माता || धृ. ||
तेज स्वरूप अति पाहुनी आपुले | आनंदले हे भक्त सारे
नयनामधले दीप आपुल्या | देई प्रकाश आम्हाला |
जय जय जय हरीनंदा नाथा || १ ||
सदाचार सतशील वृत्तीचे | देह झिजती हे हरी प्रेमाचे |
अर्पुनी सर्व आईचे पायी | लागती हे चरणाला |
जय जय जय हरीनंदा नाथा' || २ ||
बाह्य रुपी जरी दिसती सावळी | कीर्ती तयाची परी आगळी
शिवशक्तीचा थोर महिमा | धूळ चरणाची लावितो माथा |
जय जय जय हरीनंदा नाथा || ३ ||

|| श्री सद्गुरू हरिहर शक्ती पीठ रेणुकामाता मंदिर औरंगाबाद ||

दत्त जयंती उत्सव उपासना काही क्षणचित्रे

हरिहर सद्गुरू शक्तीपीठ रेणुका माता दरबार


योगीराज नगर औरंगाबाद

९५९५४२३४९९